फैजपूर –
यावल तालुका विधी सेवा समिती वकील संघ फैजपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालत व मार्गदर्शन शिबीर पोलीस ठाणे येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे न्यायाधीश मा .व्ही एस .डामरे होते सरकारी वकील एडवोकेट विक्रम शेळके,, एडवोकेट याकुब तडवी, एडवोकेट खालीद शेख, सहाय्य्क पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे व्यासपीठावर उपस्थित होते.
महिला मुले ज्येष्ठ नागरिक यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी अनेक कायदे आहेत. महिलांवर अन्याय झाल्यास त्या कायद्याचा वापर करून त्यांना न्याय मिळू शकतो. यावेळी विविध कायद्यांची माहिती देण्यात आली. लोक अदालत मध्ये वाद समजुतीने वाद निकाली निघतो असे यावल न्यायाधीश व्ही एस डामरे यांनी यावेळी सांगितले
फिरते लोक अदलातीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा याबाबतही जनजागृती करण्यात आली.तसेच यावेळी दोन दिवाणी प्रकरण निकाली काढण्यात आली .
या वकिलांनी केले मार्गदर्शन
ऍडव्होकेट खालीद शेख, ऍडव्होकेट अशोक सुरडकर, ऍडव्होकेट नितीन चौधरी, ऍडव्होकेट किशोर सोनवणे, ऍडव्होकेट आकाश चौधरी, शशिकांत वारूळकर यांनी मार्गदर्शन केले .
यांची होती उपस्थिती
ऍडव्होकेट अशोक सुरळकर, ऍडव्होकेट अजय कुलकर्णी, ऍडव्होकेट वाघमारे, ऍडव्होकेट नितीन भावसार,ऍडव्होकेट यशवंत दाणी, पीएसआय बबनराव पाटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यावल विनोद गोसावी, पी एल व्ही शशिकांत वारुळकर, अजय बढे, हेमंत फेगडे नंदकिशोर अग्रवाल, यावल प्रस्तुत पोलीस ठाण्याची कर्मचारी अधिकारी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी फैजपूर पोलीस स्टेशन व
सी एम झोपे, सतीश जाधव, संजीव तडवी ज्ञानेश्वर गावंडे, दर्पण पाटील यांनी परिश्रम घेतले आभार सहाय्य्क पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी केले.



