सुनसगावनजीक भरधाव पिकअपच्या धडकेने दोघे परप्रांतीय दुचाकीस्वार ठार

भुसावळ : सुनसगाव पेपरमिलजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवार, 10 रोजी दुपारी 12.45 वाजता घडली होती. या घटनेत दुचाकीस्वार रामसिंह गमरिया भिलाला (47, कोटबेडा, पो.पिपलझोपा, ता.झिर्निया, जि.खरगोन, मध्यप्रदेश) व मोटला छितरीया भिलाला (40, मसानिया फाल्या, ग्रामपंचायत उमारीया, ता.भगवानपूरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू ओढवला होता. अपघातप्रकरणी पिकअप चालक सुनील निना जोहरे (पिंपळगाव खुर्द, ता.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव पिकअपच्या धडकेने अपघात
रामसिंह व मोटला हे दोघे दुचाकी (एम.पी.10 झेड.बी.0401) वरून सुदर्शन पेपर मिलकडे जाणार्‍या रस्त्यावरून शेतात जात असताना भरधाव पिकअप (एम.एच.15 डी.के.1569) वरील चालक सुनील जोहरे यांनी जोरदार धडक दिल्याने दोघा परप्रांतीयाचा मृत्यू ओढवला होता. हा अपघात बुधवार, 10 रोजी दुपारी 12.45 वाजता घडला होता.

अपघात प्रकरणी शांताराम गमरिया भिलाला (32, तांडावाडी, कोटबैडा, पो.पिपलझोपा, ता.झर्निया, एम.पी.) यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालक सुनील जोहर विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.