भुसावळ : शहरातील लक्ष्मी नगरात किरकोळ वादातून 33 वर्षीय महिलेच्या मानेवर मारहाण करीत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शुक्रवार, 5 रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
33 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपींनी शिविगाळ करीत मानेवर बुक्का मारला तसेच फिर्यादीच्या आईला शिविगाळ केली व तक्रारदाराचा विनयभंग केला. याप्रकरणी छाया हेंडे, जगदीश हेंडे, नेहा हेंडे, बंटी हेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तेजस पारीसकर करीत आहेत.



