वरणगाव –
आयुध निर्माणी वसाहतीत कनिष्ठ विद्यालयात इयत्ता दहावीच्या पहिल्याच दिवशी
पेपरला परिक्षा केंद्रावर आपल्या मित्राला कॉपी पुरवीण्या साठी पोलीसानी जाऊ न दिल्याने राग येवून एकाने विद्यालयाच्या अवतीभोवती असलेले कोरडे गवत पेटवुन दिल्याची घटना येथे घडल्याने परिक्षा केंद्रात एकाच खळबळ उडाली
या बाबत असे दि ३ मार्च रोजी इ दहावीची परिक्षा सुरू झाली असुन कॉपी रोखण्या साठी शिक्षण मंडळा कडून विविध उपाय योजना केल्या जात असल्या नंतरही आयुध निर्माणी वसाहत मधिल नुतन मराठाचे कनिष्ठ विद्यालय असुन इ दहावीचा पहिला पेपर होता परिक्षेसाठी केंद्रावर सोडण्यासाठी पालक आपल्या पाल्याला तर काही आपल्या मित्राला परिक्षा केंद्रावर सोडण्या साठी जातात तर काही हैशी मित्र आपल्या मित्राला कॉपी पुरविण्या साठी जातात तसाच प्रकार या परिक्षा केंद्रावर घडला पेपर सुरु झाल्या नंतर केंद्रावर सुरक्षा बदोबस्त साठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी पो हे कॉ नरसिंग चव्हाण , राहुल येवले, नविदअली सादिक अली सय्यद महिला कर्मचारी सिमा पाटील हे बदोबस्त काम करीत असताना विद्यालया जवळील शिवमंदीरा कडे जाणाऱ्या रस्त्या वरील काही कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने परिक्षा केंद्रा जात असणाऱ्या अमोल गोपाळ व त्याचे दोन तीन सहकारी यांना पोलीसानी हटकून परिक्षा केंद्रा भोवती गर्दी करू नका असे सागुन तेथुन पळून लावले त्याच्यातच या मित्रामध्ये काही तरी वाद झाल्यान एकमेकाना काठीने हाणामारी करीत होत असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी पोलीस जाऊन त्यांना पुन्हा तेथुन हुसकावुन लावल्याने याच गोष्टीचा राग आल्यान आमोल गोपाळ याने व त्याचे दोन ते तीन जोडीदाराने परिक्षा केंद्रा भोवती असलेल्या वाळलेल्या गवतास आगपेटीने आग लावली आगीचा धुर परिक्षा केंद्रा पर्यत पोहचल्याने विद्यार्थ्यान मध्ये भितीच वातावरण निर्माण होऊन खोकल्याचा त्रास सुरू झाला होता मात्र तातकाळ आयुध निर्माणी मधील अग्नी सुरक्षा दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेत दोघांची एकमेकाना काठीने हणामारी होत असतांना त्यांना सोडविण्या गेलेल्या पो कॉ नविदअली सय्यद , व राहुल येवले हे जखमी झाले असून याबाबत पो कॉ नविदअली सय्यद च्या फिर्यादी वरून वरणगाव पोलीसात अमोल गोपाळ च्या विरोधात भा द वी कलम ३५३ , ३२३ , ४३५, ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकास अटक करण्यात आली आहे
घटनेचा पुढील तपास सह पो निरिक्षक सदिप बोरसे हे करीत आहे



