भुसावळ (प्रतिनिधी )-
पश्चिम रेल्वेच्यावतीने होळीच्या निमित्ताने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून त्यांचे सोईंसाठी विशेष हमसफर ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वांद्रे टर्मिनस – गया स्पेशल हमसफर ट्रेन (१ फेरी)
ट्रेन क्रमांक – ० ९०२९ डाऊन वांद्रे टर्मिनस – गया स्पेशल हमसफर सुपर फास्ट ट्रेन ही वांद्रे टर्मिनस येथून शनिवारी दि .०७.०3.२०२० रोजी सकाळी .५.१० वाजता सुटेल व दुसर्या दिवशी २ वाजता गया स्टेशनवर पोहोचेल.
ट्रेन क्रमांक – ० ९०३० गया – वांद्रे टर्मिनस स्पेशल हमसफर सुपर फास्ट ट्रेन रविवार दिनांक – ०८.०३.२०२० गया स्टेशन ५ वाजता सुटेल व तिसर्या दिवशी वांद्रे टर्मिनस स्थानकात १२.२५ वाजता पोहोचेल.प्रवासात ही गाडी बोरिवली, विरार, वापी, भेट, चलथान, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, अलाहाबाद चोकी, पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन, सासाराम, डेहरी ऑन सोन या स्थानकावर थांबेल. गाडीला १५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ४ स्लीपर श्रेणी डबे असतील
वांद्रे टर्मिनस – बारोनी स्पेशल हमसफर ट्रेन (१ फेरी)
ट्रेन क्रमांक – ०९०३१ डाउन वांद्रे टर्मिनस – बरोणी स्पेशल हमसफर सुपर फास्ट ट्रेन मंगळवारी ०३.०३.२०२० रोजी वांद्रे टर्मिनस येथून १२.५५ वाजता सुटेल व तिसर्या दिवशी दुपारी २.३० वाजता बरोणी स्थानकात पोहोचेल.
बरोनी – वांद्रे टर्मिनस स्पेशल हमसफर सुपर फास्ट ट्रेन – ०९०३२ गुरुवारी पहाटे ०५.०३.२०२० रोजी बरोनी स्थानकातून सकाळी ५.५५सुटेल व दुसर्या दिवशी ५.३५ वाजता वांद्रे टर्मिनस स्थानकात पोहोचेल. प्रवासात ही गाडी बोरिवली, विरार, वापी, बलसाड, उधना, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, अलाहाबाद चोकी, पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटल , हाजीपुर या स्थानकावर थांबेल. या गाडीला १५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ४ स्लीपर वर्ग डबे असतील .



