भुसावळ :- येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संशोधन व विकास समितीतर्फे Research Techniques and Literature Review” व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी उपस्थित होते . प्रमुख वक्ते म्हणून धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हरीश आर. तळेले, संशोधन आणि विकास समिती प्रमुख प्रा. डॉ. सचिन येवले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. हरीष तळेले यांनी प्रोसेस अँड प्लॅनिंग ऑफ रिसर्च, टाइप्स ऑफ रिसर्च, लिटरेचर रिव्यू आणि ऑन जॉब ट्रेनिंग आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले .
उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संशोधनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन आणि विकास समिती प्रमुख डॉ. सचिन येवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत सरोदे तर आभार प्रदर्शन डॉ. मनोज जाधव यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळाचे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. डॉ. रश्मी शर्मा. प्रा. डॉ. उमेश फेगडे, प्रा. डॉ. सचिन कोलते तसेच रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विलास महिरे, प्रा. डॉ. अजय क्षिरसागर, प्रा. तेजश्री झोपे, प्रा. शंकर पाटील, प्रा. धनश्री बर्डे आणि रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ – रिसर्च टेक्निक विषयी व्याख्यान देताना प्रा.डॉ. हरीश तळेले,सोबत व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बी एच बऱ्हाटे, प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी,रिसर्च कमिटीचे चेअरमन प्रा.डॉ.सचिन येवले प्रा डॉ चंद्रकांत सरोदे


