पालकांनी संस्कार व शिस्त याचा समतोल राखला पाहिजे – कौन्सिलर आरती चौधरी : कीडल्स पॅराडाईज नर्सरीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !


भुसावळ – मुलांसमोर “रोल मॉडेल” हे आईवडीलच असतात व त्यामुळे आईवडीलांच्या वर्तनातुनच मुलांवर संस्कार होत असतात. पालकांनी संस्कार व शिस्त याचा समतोल राखला पाहिजे. व देशाला उद्याचे उत्तम नागरीक द्यायचे आहेत.असे मत व्यक्त करीत त्यांनी “मुलांचे संगोपन करताना संस्कार कसे करावे” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन उपस्थित पालकांना केले. येथील शारदानगर भागातील ” किडल्स पॅराडाईज नर्सरी व प्ले ग्रुपचे ” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सक्षम कौन्सिलिंग सेंटर भुसावळच्या मॅनेजिंग डायरेक्टर व कौन्सिलर आरती सारंग चौधरी या उपस्थित होत्या.

. या कार्यक्रमामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या कलागुणांची उधळण करून आनंद घेतला .याबरोबर काही पालकांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ” किडल्स पॅराडाईज” च्या संचालिका डिंपल प्रमोद चौधरी आणि प्रमोद किसन चौधरी यांनी परिश्रम घेतले

कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शन हिमांशू अग्रवाल व काजल अग्रवाल यांनी केले तसेच मनीषा चौधरी ,श्रद्धा बोंडे, वैशाली ढाके, बोंडे ओम कुमार, अनुष्का चौधरी, पूजा अराक, अनिल आराक, राजेंद्र सरोदे, राजेंद्र चौधरी, यांचे अनमोल सहकार्य लाभले . हा कार्यक्रम कमल गणपती हॉल येथे झाला. ऋतुजा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.