भुसावळ नगरपालिकेचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष…. ॲड. जास्वंदी भंडारी


भुसावळ – शहरात अनेक ठिकाणी खुली जागा,खळे प्लॉट आहेत याठिकाणी होणार्या घाण व कचरा तसेच शहरांत इतर ठिकाणी होणार्या घाणीकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे
भुसावळ शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजुला, खुल्या प्लॉटला कचरा कुंडीचे स्वरुप आलेले आहे शहरांतीलच एक भाग हुडको कॉलनी व इंदिरानगर यामधील खुला प्लॉटवर शौचाच बसणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रार देऊनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे या खुल्या प्लॉटवर महिला ,मुली मुलं शौचास बसतात तसेच सर्व इंदिरानगर येथील रहिवासी कचरा या ठिकाणी टाकतात तसेच जो रस्ता हुडको कॉलनीनीतुन जातो त्या रस्त्यावर म्हशींचा गोठा देखील आहे त्या गोठ्यातील गायी म्हशींचे शेण मलमूत्र याचाही त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे या घाणीमुळे दुर्गंधी, डास, हिरव्या मोठ्या माश्या याचा प्रादुर्भाव झाला आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कॉलनीच्या चहुबाजूनी कचरा आणि शौचास बसण्याची समस्या आहे या समस्या कडे नगरपालिके कडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे इंदिरानगर परिसरात कचरा गाडी येत नाही म्हणून हे रहिवासी कचरा खाली प्लॉट वर टाकतात असं त्यांचे म्हणणे आहे व शौचालय नाहीत म्हणून बाहेर शौचास बसतो असेही शौचास बसणारे सांगतात , मग हा प्रश्न उपस्थित राहतो की शासनाकडून जर सर्वांना शौचालयांसाठी निधी उपलब्ध झाला आहे तर हा निधी दिला गेला नाही का ?जर निधी उपलब्ध करून दिला तर त्या निधीचा वापर शौचालय बांधण्यासाठी झाला की नाही हे नगरपालिकेचे संबधित अधिकारी यांनी बघितले नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात ही समस्या जशी या परिसराची तशी समस्या संपूर्ण भुसावळ मध्ये अनेक ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत असे अनेक समस्यांनी भुसावळकर त्रस्त आहेत म्हणून नगरपालिकेने भुसावळ शहराचा समोरचा चेहरा फक्त रंगरंगोटी करून न बदलता भुसावळ करांच्या मुलभुत समस्या स्वच्छता, पाणी, आरोग्य याकडे लक्ष द्यावे फक्त कर वसुली सक्तीने करण्यापेक्षा आधी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याचा प्रयत्न पालिकेने करावा आणि माननीय जिल्हाधिकारी यांनीही याबाबींकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी भुसावळ रहिवासी ॲड जास्वंदी भंडारी यांनी केली आहे