छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धा – २०२४ -चे आयोजन करण्यात आले आहे .

याध्ये गट आणि विषय

गट क्रमांक १ ( इयत्ता १ली व २री) वेळ : २ मिनिट
विषय: छत्रपती शिवाजी महाराज

गट क्रमांक २ ( इयत्ता ३री व ४थी) वेळ : ३ मिनिट
विषय:
अ) शिवरायांचे बालपण
ब) माता जिजाऊ आणि बाल शिवाजी
क) महाराजांच्या शौर्याचे प्रतीक-प्रतापगड

गट क्रमांक ३ (इयत्ता ५वी ते ७वी) वेळ : ४ मिनिट
विषय
अ) शिवरायांचे शूरवीर मावळे
ब) शिवरायांची गुणग्राहकता
क) युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज

गट क्रमांक ४ (इयत्ता ८वी ते १०वी) वेळ : ५ मिनिट
अ) राज्याभिषेक शिवछत्रपतींचा
ब) आज शिवराय असते तर…
क) शिवरायांची युद्धनीती

गट क्रमांक ५ (खुलागट) वेळ : ७ मिनिट
अ) छत्रपती शिवाजी महाराज – द मॅनेजमेंट गुरु
ब) शिवशाही ते लोकशाही
क) छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
ड) शिवकालीन किल्ल्यांचे भू- सामारिक महत्त्व

महत्त्वाच्या सूचना :-

१)वेळ संपण्याच्या अर्धा मिनिट आधी एक टोल देण्यात येईल तसेच पूर्ण वेळ संपल्यावर तीन टोलची बेल वाजविली जाईल.
२)भाषणाचे परीक्षण – सभाधिटपणा, विषयाची मांडणी, आवाजातील चढ-उतार, हावभाव, एकूण परिणामकारकता या मुद्द्यांवर केले जाईल. त्यानुसार मुद्द्यांना अनुसरून चांगली तयारी करावी.
३)परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
४)स्पर्धकांनी वेळेवर हजर राहावे.
५)घरून येतांना पोटभर नाश्ता करून यावा आणि सोबत पाण्याची बाटली ठेवावी.
६)स्पर्धेच्या दोन फेऱ्या असतील. प्रथम फेरी झाल्यानंतर त्यातून प्रत्येक गटातून १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दुसरी फेरी ही भुसावळ शहरात घेतली जाईल. यावेळी निवड झालेल्या स्पर्धकाला पुन्हा तोच विषय सादर करावा लागेल. त्यातून अंतिम निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.
७)विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, पुस्तक व प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

१)स्पर्धेत नोंदणीसाठी खाली दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.
गुगल फॉर्म लिंक :
https://forms.gle/pxiuy9Y4Ktp1QYbg6

२)स्पर्धकांनी गुगल फॉर्म भरल्यानंतर खालील व्हाट्सअप ग्रुप लिंकला टच करून स्पर्धेच्या ग्रुपला जॉईन व्हावे.
व्हाट्स एप गृप लिंक :
https://chat.whatsapp.com/FOvO8CZp12i4ocJNCAkN5H

३)आपण जॉईन झालेल्या व्हाट्सअप ग्रुपवर स्पर्धेबाबतच्या सूचना वेळोवेळी देण्यात येतील.

४) स्पर्धेमध्ये नावनोंदणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.

स्पर्धेची दिनांक : २५ फेब्रुवारी २०२४
वेळ : सकाळी ९:३० वाजता.
ठिकाण : ताप्ती पब्लिक स्कूल, नाहाटा महाविद्यालय शेजारी, जामनेर रोड, भुसावळ

संपर्क:-
प्रकल्प प्रमुख:- देव सरकटे-
8983610917
प्रकल्प समन्वयक:- समाधान जाधव – 9022464981
9665692171
सह समन्वयक:- विजय चौधरी – 9421741824

सह समन्वयक:- सचिन वासुदेव पाटील – 7304017217

श्री.संदीप वसंतराव पाटील (अध्यक्ष, अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ.)7588009492

9209248392

उपक्रम समिती : ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, डॉ.संजू भटकर, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, अमितकुमार पाटील, शैलेंद्र महाजन, प्रा.डॉ.शामकुमार दुसाने, भूषण झोपे, हितेंद्र नेमाडे, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे, ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, मंगेश भावे, उमेश फिरके, केतन महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, गणेश जावळे.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन
अंतर्नाद प्रतिष्ठान परिवार भुसावळ यांनी केले .