चाळीसगाव :
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे मॅनेजर आज 9 रोजी सकाळी दहावाजे समारास गणेशपूर शाखेवर कामांवर जात असताना खडकी जवळील फुलाचे काम चालू असल्याने डायवर्षण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटरसायकलवर आलेल्या व तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी हवेत गोळीबार करून व त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला .बॅग मॅनेजर देत नाही म्हणून लूटारूनी त्यांच्या जवळील हत्याराने मॅनेजर यांना जखमी केले व बॅग घेऊन गुन्हेगार पसार झाले यावेळी खडकी बु येथे भीतीच वातावरण निर्माण झाले होते



