भुसावळात मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजाचा एल्गार , समाज विकासासाठी कृती समितीची स्थापना – संतोष बारसे : समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न : राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित ;

भुसावळ – समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रातील विकासासाठी सर्व मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजातील विविध संघटना एकवटली असून कृती समिती तयार करण्यासाठी एकत्र आले आहे .या राज्यस्तरीय बैठकीच्या माध्यमातून ही कृती समिती स्थापित झाली असून संपूर्ण महाराष्ट्र् राज्यातील मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजातील समस्या सोडविण्याकरिता शासन दरबारी मागणी करणार असल्याची माहिती बावनी पंचायत मेहतर वाल्मीकि महाराष्ट्र राज्य लोक नियुक्त अध्यक्ष संतोष बारसे यांनी आयोजित महत्वपूर्ण बैठकीत दिली .यावेळी समाजाला महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले . या बैठकीस जळगांव, धुळे अहमदनगर, नाशिक ,अमरावती, अकोला, नागपुर यासह विविध जिल्ह्यातील प्रमुख व समाजातील पदाधिकारी उपस्थित होते . स्थानिक स्व. मोहन पहेलवान बारसे मंगल कार्यालय , वाल्मिक नगर येथे २८ रोजी आयोजित बैठकीस बावनी पंचायत मेहतर वाल्मीकि महाराष्ट्र राज्य लोक नियुक्त अध्यक्ष संतोष बारसे कार्य अध्यक्ष किशोर पिवाल
अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघ ट्रेड यूनियन
आनंद जावड़ेकर गणेश बारसे
अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्वेदी श्रेणी कर्मचारी संगठन सुरेश बिसनरिया, संजय जावड़ेकर
अखिल भारतीय सफाई कामगार संगठन दिल्ली धनराज चावरिया प्रदेश अध्यक्ष, संतोष थामेत
भारतीय वाल्मीकि समाज
प्रदेश अध्यक्ष सुरेश दलोड़
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार यूनियन
महाराष्ट्र महामंत्री जय सिंह कछुआए
अखिल भारतीय वाल्मीकि महासभा
प्रदेश अध्यक्ष रवि करोसिया ,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्राम पंचायत कर्मचारी प्रदेश अध्यक्ष विजय रल
वाल्मीकि कॉमर्स एसोसिएशन अध्यक्ष शरद टाकभोरे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वानी एकत्र येऊन एकजुटीने कार्य केल्यास समाज उन्नती होऊन समाजाचा विकासा निश्चित होईल असा ठाम विश्वास मनोगतातून व्यक्त केला . मान्यवरांचे स्वागत व सत्कार भुसावळकरांच्या व महेतर सामाजाच्यावतीने संतोष बारसे यांनी केला .