नाहाटा महाविद्यालयाच्या रासेयोच्या हिवाळी शिबिराच्या श्रमदानाचे उद्घाटन संपन्न

भुसावळ –
भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वराडसीम या दत्तक गावात विशेष हिवाळी शिबिरात दुसऱ्या दिवशी श्रमदानाचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक वराडसिम गावाचे उपसरपंच .विजयसिंग पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे वराडसीम गावाचे सरपंच पती उमेश पाचपांडे व ग्रामपंचायत सदस्य इरफान खाटीक उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी केले. त्यांनी सक्षम युवा समर्थ भारत याशिबिराच्या संकल्पनेवर आधारित श्रमदानाचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्विनी झोपे या स्वयंसेविकेने केले.
आपल्या कार्यक्रमास लाभलेले उद्घाटक उपसरपंच विजयसिंग पाटील यांनी श्रमदानास शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे सरपंच पती उमेश पाचपांडे व ग्रामपंचायत सदस्य श्री.इरफान खाटीक यांनीही श्रमदानास व विशेष हिवाळी शिबिरास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रा.डॉ.विलास महिरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. आपल्या आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ममता पाटील व माजी स्वयंसेवक जगदीश पाटील, प्रवीण पाटील तसेच प्रफुल वाघमारे, गौरी ढाके, गोविंदा बावस्कर इ. उपस्थित होते.