भुसावळातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत टपरी हटविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ – भुसावळ शहरातील जाम मोहल्ला मज्जीद जवळील मुख्य रस्त्यावर वमेन्स कर्तनालय व्यवसायांची अनधिकृत टपरी शेख इम्रान शेख इब्राहिम यांनी लावली असून टवाळखोर मुले याठिकाणी जमाव करून शाळकरी मुलींची छेडखाणी करून अश्लील कृत करण्याचा प्रकार सुरू आहे.

याबाबत टपरी व्यवसायिकला परिसरातील नागरीकांनी सांगितले अग्रता अरेरारीची भाषा करीत माझ्या विरुद्ध कोणी तक्रार दिल्यास हात पाय तोडून टाकण्याची धमकी देत आहे. अशा या दैनंदिन होणान्या त्रासामुळे नागरीक त्रस्त झाल्याने उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तसेच नगर परिषद मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना अनधिकृत टपरी हटविण्याबाबत परिसरातील नागरीकांनी निवेदन दिले आले. भुसावळ नगर परिषदे मार्फत अनधिकृत व्यवसायिक शेख इम्रान शेख इब्राहिम यांना दिनांक २८/१२/२०२३ रोजी नोटीस बजावण्यात आलेली आहे मात्र अद्याप पावती कुठलीही कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नसल्याने पुन्हा परीसरातील पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची भेट घेतली असता आठ दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले आहे.