भुसावळ – येथील बियाणी मिलीटरी स्कुल मध्ये वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न झाले. प्रसंगी विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमासह चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,प्रांताधिकारी जितेंद्र पाटील,उपविभागीय पोलीस अधिक्षक कृष्णांत पिंगळे, आमदार संजय सावकारे,सुभेदार मेजर प्रेमसिंग, सुभेदार जहीर अहमद,पीएचएम अमोल साळुंखे, बियाणी एज्यूकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ.संगिता बियाणी,रोनक बियाणी,आयुषी बियाणी,राजू बियाणी, प्रिंसीपल डी एम पाटील,रुद्रसेन गंठीया,कांचन जोशी,गोपाळ ठाकूर,राजेश पारीख,प्रविण भराडीया,निर्मल दायमा हे होते.
यावेळी प्रमुख पाहूण्यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी द्वीपप्रज्वलन, सरस्वती पुजन सह मशाल ज्योत पेटऊन तसेच एकवीस तोफची सलामी देऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमास सुरवात झाली. प्रसंगी जिल्हाधीकारी आयुष प्रसाद व प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
*सांस्कृतीक कार्यक्रमात सर्वांची मने जिंकली*.

यामध्ये हॉर्स रायडिंग,मोटार पिरॅमिड,बांबू डांस,सेक्शन ,लावणी नृत्य,कराटे, देशभक्तीपर नृत्य,रिदेमिक डांस,भारतीयम,मल्लखांब, रायफल शुटींग, वेस्टन डांस,घोडसवारी अशा विवीध कला गुण विद्याथ्र्यांनी सादर केले. सातशे विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. सुत्र संचलन अलीना खान व श्रेया बिऱ्हाडे तर आभार प्रिंसीपल डी एम पाटील यांनी मानले.









