तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचण्याचा मानस : संदीप काळे : व्हाईस ऑफ मीडियाच्या केडर कॅम्पचा समारोप :

जळगाव – पत्रकारांना संघटित करून एक विधायक शक्ती निर्माणासाठी येत्या तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचून प्रत्येकाला संघटनेच्या प्रवाहात आणण्याचा मानस व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संपादक संदीप काळे यांनी व्यक्त केला.येथील जैन हिल्समध्ये व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या राज्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसीय केडर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. आज २८ जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी समारोपप्रसंगी ते बोलत होते.तत्पूर्वी शनिवारी सायंकाळ च्या सत्रात सत पंथ चे महामंडलेश्वर संत श्री. जनार्दन हरीजी महाराज यांचे ” आध्यात्म आणि पत्रकारिता ” या विषयावर अत्यंत मार्मिक आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले, श्री. जनार्दन महाराज यांनी श्रधा आणि विश्वास याचे महत्व विषद करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजाभिमुख पत्रकारिता किती गरजेची आहे, या विषयी उदबोधन केले. त्यांच्या प्रभावी वाणीतून त्यांच्या विचारांचे दर्शन घडले.

प्रशिक्षण कार्यक्रमाला नाशिक येथील मोमेंटमचे संचालक गजेंद्र मेढी यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी संघ भावना जोपासणे,स्वतः स्वस्थ मानसिकतेत राहणे, भविष्यात येणाऱ्या बदलांना सकारात्मक पद्धतीने कसे सामोरे जावे,सामाजिक भान कसे जपावे,व्यक्तिमत्व विकास कसा करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना गुड आहेच परंतु संघटनेला ग्रेट कसे बनवता येईल यासाठी उपस्थित पत्रकारांना कानमंत्र दिले.
यावेळी जैन उद्योग समूहाचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करतांना संघटनेचे केंद्रीय अधिवेशन जळगाव येथे आयोजित करावे भविष्यात संघटनेला जैन उद्योग समूह कायम सहकार्य राहील, याबाबत आस्वस्थ केले.अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिराला प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ,अनिल मस्के पाटील,सुरेश उज्जैनवाल, मराठवाडा विभाग प्रमुख विजय चोरडिया,राज्य प्रभारी शिक्षण विंग चेतन कात्रे,साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, साप्ताहिक विंग जळगाव जिल्हा अध्यक्ष रवींद्र नवल,जळगाव विभाग प्रमुख डीगंबर महाले, जळगाव जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके,राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोडकर,राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले,ग्रामगौरवचे विवेक ठाकरे, पत्रकार हल्ला विरोधी विंगचे प्रदेशाध्यक्ष संदीप महाजन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.