
भुसावळ – आपले आरोग्य आपण तयार करा आपले आरोग्य हिच आपली शक्ती व प्रेरणा आहे यासाठी आपले आरोग्य आपणच तयार करा आनंदी जीवन जगा स्वता:साठीं जगा व परिवाराला आनंदी जिवन द्या आरोग्यासाठी वेळ काढा असे आवाहन प्रमुख पाहुणे डॉ दीप्ती पाटील यानी केले तसेच महिलांना निरोगी राहण्यासाठी दैनंदिन शैली तसेच पोषक आहार बद्दल सोप्या भाषेत माहिती दिली.

शनिवारी अर्पण हॉस्पिटल, भुसावळ येथील सक्षम नारी संस्थेच्या वतीने पारंपरिक मकर संक्रांत सणा निमित्त असलेले हळदीकुंकू याला आधुनिकतेचा साज चढवून एक आगळेवेगळे हळदीकुंकू साजरे करण्यात आले हळदी कुंकू समारंभात वाण देण्याची पद्धत आहे मात्र वाण म्हणून भेटवस्तू न देता महिलांना आरोग्याचे वाण दिले . यावेळी निःशुल्क बोन मैरो डेन्सिटी (BMD) चेकप व हिमग्लोबिन चेकप करण्यात आले . रक्तातील हिमोग्लोबीन तपासणी, हाडांच्या ठिसूळ पणासाठी केलेली Bone Marrow Density आणि ब्लड प्रेशर तपासणी हेच आरोग्याचे वाण देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दिप्ती पाटील , झुंबा ट्रेनर् पारुल वर्मा , रेल्वे ऑफिसर भावना झा , यांचेसह प्रतिष्ठीत महिला उपस्थित होत्या .
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप्रज्वलन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले .
मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायनात जातो. त्यामुळे सूर्य प्रकाशात जाऊन आपन नैसर्गिक व्हिटामिन डी 3 मिळवले पाहिजे. तिळगूळा मध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाड मजबुत होतात म्हणून त्यांचे सेवन केले पाहिजे. आपल्या पारंपरिक सणाचे आरोग्याशी निगडित महत्व जाणुन आपण आपल्या सणाचे आधुनिकीकरण केले पाहिजे. वेळे वर तपासणी करून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे असे संस्थाध्यक्षा डॉ सुवर्णा गाडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. यावेळी झुंबा ट्रेनर् पारुल वर्मा यांनी व्यायामाचे महत्त्व विशद केले .तर रेल्वे ऑफिसर भावना झा यानी उत्स्फूर्त पणे आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित महिलांना आधी आपन जिजाऊ होऊ आणि मग शिवाजी जन्माला घालू असे आवाहन केले. सूत्रसंचालन शीतल मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सुनीता जोशी यानि केले.
कार्यक्रमात तपासणीचा १५० महिलांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्षम नारी फ़ाउंडेशन च्या डॉ सुवर्णा गाडेकर, डॉ वैशाली रामवंशी, शीतल मोरे, संघमित्रा ढाकणे, वंदना कांबळे, शीतल मोरे, गायत्री विसपुते, वंदना हंस, शीतल भालेराव, सुनंदा डांगे, सुनीता जोशी व अर्पण हॉस्पिटल मधील नम्रता माने, योगिता, निर्मला, निशा,अंजली, दुर्गा, संजय पाटील आणि चन्दन यांचे सहकार्य लाभले.


