बिलासपूर -हापा साप्ताहिक एक्स्प्रेस ओखा पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे:-
बिलासपूर -ओखा एक्सप्रेस साप्ताहिक
२२९४० बिलासपूर -ओखा साप्ताहिक एक्सप्रेस बिलासपूर येथून २९.०१.२०२४ पासून दर सोमवारी १०.४५ वाजता सुटेल आणि ओखा येथे दुसऱ्या दिवशी १८.५० वाजता पोहोचेल.
२२९३९ ओखा – बिलासपूर साप्ताहिक एक्सप्रेस ओखा येथून दि. २७.०१.२०२४ पासून दर शनिवारी १९.०५ वाजता सुटेल आणि बिलासपूर येथे तिसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
थांबे: हापा आणि ओखा दरम्यान जामनगर, खंबालिया आणि द्वारका
बिलासपूर आणि हापा मधील वेळ, थांबा आणि संरचना मध्ये कोणताही बदल नाही.
कृपया प्रवाशांनी यांची नोंद घावी.



