Top Content

जळगाव ;– भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील एका २१ वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे त्याला २५ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याबाबत भुसावळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की हर्षल ज्ञानेश्वर चौधरी वय २१ राहणार वराडसीम ता. भुसावळ याने २५ रोजी कुठले तरी विषारी औषध सेवन केल्याने त्याला उपचारासाठी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचे उपचारदरम्यान निधन झाले याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


