भालोद महाविद्यालयात राष्ट्रीय तंबाखूमुक्त दिवस कार्यक्रमाचे आयोजन :

भालोद –
कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे विद्यार्थी विकास विभागाचे वतीने राष्ट्रीय तंबाखूमुक्त दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी सहभागी झालेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर दिनेश पाटील यांनी तंबाखूमुक्त परिसराची शपथ दिली. अमली पदार्थ तसेच तंबाखू युक्त पदार्थ बिडी, सिगारेट, ई.सिगारेट, हुक्का यांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याची जाणीव याप्रसंगी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे.उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दिनेश पाटील प्रा. मोहिनी तायडे तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले