नाहाटा महाविद्यालयात कला मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन


भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही कला मंडळ २०२३-२४ तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस. व्ही. पाटील यांनी केले .उपप्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी, कला मंडळाचे चेअरमन डॉ. एस. टी. धूम, जिमखाना प्रमुख डॉ. आनंद उपाध्याय, त्यांचे सहकारी श्री. श्याम भारंबे सह प्राध्यापक उपस्थित होते. यावर्षी विविध स्पर्धांमध्ये बॅडमिंटन, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, स्लो सायकलिंग, क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केले गेले. यात विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातही स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय विजेते ठरवण्यात आले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना नृत्य स्वरांजली या कार्यक्रमात बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, ज्येष्ठ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, कला मंडळाचे चेअरमन डॉ. एस. टी. धूम , डॉ. साहेबराव राठोड, डॉ. आर एस नाडेकर, डॉ के के अहिरे, डॉ. पी. एच. इंगोले यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच जिमखाना स्वयंसेवक उपस्थित होते. उद्या दिनांक गुरुवारी 18 रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा व 19 रोजी (शुक्रवार) दहा वाजता नृत्य स्वरांजली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .