चाळीसगावात ११ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार : एकास अटक :

चाळीसगाव : शहरातील एका भागातील 11 वर्षीय अल्पवयीन बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना १४ रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी संशयित अफरखान राऊत खान (२२, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

वडिलांना ठार मारण्याची धमकी
पीडीतेच्या ४२ वर्षीय आईने चाळीसगाव शहर पोलिसात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यांची ११ वर्षीय मुलगी बाहेर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट दिले तसेच शंभर रुपये देत एका घरात नेत तिच्यावर अत्याचार केला तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शहर निरीक्षक संदीप पाटील आदींनी भेट दिली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.