गुन्हेगारांची गय केली जाणार नाही – भाग्यश्री नवटके

भुसावळ (प्रतिनिधी)- गुन्हेगारांची गय केली जाणार नसुन योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करण्यात येणाऱ असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दीली.
२५ रोजी सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवटके यांनी भेट दिली व कामकाजाची पाहणी केली .यावेळी त्यानी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत उपस्थित होते. यावेळी शहरात घडलेल्या खंडणी प्रकरणाबाबतचा गुन्हा हा सत्यता पडताळूनच दाखल करण्यात आला असून इतर गुन्हे सुद्धा खात्री करुनच दाखल करण्यात येतील, पोलीस प्रशासन सतर्क असून तपास सुरु असल्याचे सांगितले .
भुसावळ शहरातील गुन्हेगार व गुन्हेगारीवर पोलिसांची करडी नजर असून चोऱ्या, घरफोडी, अवैधधंदे यावर आळा बसणार असल्याचेही अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सांगितले. तसेच पालिकेचे शिक्षण सभापती मुकेश पाटिल यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल व तश्या सूचना पोलीस उपअधीक्षक राठोड यांना दिल्याचे नवटके यांनी सांगितले.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दाखल गुन्हयात तात्काळ कारवाई करून तत्परता दाखवल्याबद्दल कौतुकही केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *