लाखोंची फसवणूक करणारा भामटा जळगाव सायबर क्राइमच्या जाळयात

जळगाव (प्रतिनिधी ) –
एलआयसी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार विलास माधव पाठक (धुळे रोड, अमळनेर) यांची ७ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपींनी बनावट एलआयीसी पाठवत तब्बल १२ लाख ७० हजार २५५ रुपयात फसवणूक केली होती. पॉलिसींमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा देण्याचे आमिष आरोपींना देत तक्रारदाराचा विश्‍वास संपादन केला होता. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तब्बल तीन दिवस पथकाने आरोपीचा दिल्ली तसेच गाझियाबादमध्ये शोध घेतल्यानंतर २३ रोजी आरोपी अमित सिंग उर्फ अमित देवेंद्र प्रकाश उर्फ मूलचंद शर्मा (बँक कॉलनी, हर्ष विहार, दिल्ली) यास अटक करण्यात यश आले. दरम्यान, आरोपीने गुन्ह्यातील रक्कम काढण्यासाठी वापरलेले वेगवेगळ्या बँकांचे सहा एटीएम कार्ड जप्त करण्यात आलेआहे .
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक अंगत नेमाणे, श्रीकांत चव्हाण, नितीन भालेराव, गौरव पाटील आदींच्या पथकाने केली. दरम्यान आरोपीला २३ रोजी अटक केली. बुधवार, २६ रोजी त्यास जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *