मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-
पालिकेच्या माध्यमातून शहर विकासाकरीता विविध कार्य तर करतो व ती करायचीच आहे याची जाणीव असतांना आपल्या सोबतकार्य करणारे अधिकारी व सहकारी यांची देखील काळजी घेणे हे सुद्धा आपले कर्तव्य व जबाबदारी असल्याची जाणीव मुक्ताइनगर येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी करीत पालिकेतील एका गरीब कर्मचाऱ्याला पदरमोड करून सायकल भेट देवून एक चांगला संदेश दिला .
नगरपालिकेत कामास असलेले शिपाई अकिल रशिद खान रा.मुक्ताईनगर यांची जेमतेंम परिस्थिती आहे . अल्पपगारात कसाबसा चरितार्थ चालवतात.त्यांचेकडे एकही वाहन नाही . कामावर त्यांना कागदपत्रे व महत्वाचे कामकाजासाठी इतरत्र ये जा करावी लागत होती . नेहमी ते पायपीट करीतच सर्व कामे करतात . कर्मचार्याची होणारी धावपळ बघून नगराध्यक्षांनी माणुसकी म्हणून स्वतः पदरमोड करीत या शिपायास नवीन सायकल भेट स्वरूपात दिली .
सायकल भेट दिल्याने कामात वेळ ,श्रम, व (इंधन ) पैसा वाचेल, यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल आरोग्यहीत जपले जाईल. हा दृष्टिकोन समोर ठेवून नगराध्यक्षा तडवी यांनी दिलेल्या भेटीचे व तडविंचे शहरातील नागरिकांनी कौतुक केल . यावेळी प्रसंगी आरिफ आझाद , वसीम खान , कर्मचारी किशोर सैतवाल, विलास पाटील , संदीप सुरवाडे यांची उपस्थिती होती .

आजही माणुसकी जिवंत-अकिल खान
माझी नेहमीची धावपळ पाहून नगराध्यक्षाताईंनी दिलेली ही भेट आयुष्यभर लक्षात राहील.ताईच्या रूपाने आजही माणुसकी जिवंत असल्याची भावना अकिल खान यांनी यावेळी व्यक्त केली .


