भुसावळ – येथे मराठा समाज बांधव व भगिनीं यांनी राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती निमित्त मॉसाहेबांचे पुजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जिजाऊ वंदना घेण्यात आली, मान्यवरांकडून विचार व्यक्त करण्यात आले, ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचे देखणं स्वप्न सत्यात उतरलं, त्या मातेची प्रेरणा घेऊन जीवनाची वाटचाल व दिशा ठरवावी असा अमूल्य संदेश देण्यात आला अनेक विद्यामध्ये मॉ जिजाऊ निपुण होत्या, कणखर होत्या म्हणून त्या हिंदवी स्वराज्य मिळवणारे छत्रपती घडवु शकले कु.मनोरमा उगले भुसावळ वकील संघाचे महिला अध्यक्षा ॲड.जास्वंदी भंडारी (पाटील ),कु.स्वरदा उगले,सौ. प्रिती चौधरी, दीनानाथ उगले, कु.गायत्री ओगले, सौ.हेमलता पाटील, सौ मोनाली उगले, सौ. महानंदा पाटील, छाया देशमुख, गौरी पाटील, दीपा पाटील, श्री डी के पाटील, श्री टी व्ही पाटील, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रताप पाटील या सर्वांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाला समाज बांधवांनी व इतर समाज बांधवांनी खूप मोठ सहकार्य केलं, व आनंदात जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.




