भुसावळातील यावल रोड वरील अतिक्रमण पुन्हा काढण्यास सुरुवात : नागरिकांनी सहकार्य करावे – प्रांताधिकारी

भुसावळ – ऐन दिवाळीत भुसावळ शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पालिका प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली परंतू दिवाळी सारखा सण तोंडावर असल्याने अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली होती . यामुळे अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्याने आज 12 जानेवारी रोजी भुसावळ शहरातील यावल रोड वरील अतिक्रमण प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून
नागरीकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.