ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना डीवायएसपी यांनी केले मार्गदर्शन :

भुसावळ – भुसावळातील ताप्ती पब्लिक सिबीएसई इग्लीश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भुसावळ तालुक्याचे डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी दि ९ रोजी मार्गदर्शन केले.
कृष्णांत पिंगळे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी इयत्ता दहावी नंतर करियर संदर्भात जे जे मार्ग व वाटा असतात विद्यार्थ्यांना सांगून त्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले. व शिस्तबद्ध जीवन पद्धतीने, अभ्यास पद्धतीने सदर निवडलेल्या करियर वाटेत आपण कसे यशस्वी होऊ शकतो हे सांगितले. यावेळी प्रिंसीपल नीना कटलर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे.