भुसावळ – पुणे येथिल ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन तर्फे पुण्यातील यशदा ऑडीटोरीयम मध्ये भुसावळच्या बियाणी एज्युकेशन गृपच्या सचिव डॉ.संगीता मनोज बियाणी यांना राज्यस्तरीय नारी भुषण पुरस्कार देऊन सन्माणीत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री सुधारक ओळवे हे होते. या वेळी ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल बेळगावे,सचिव अंकिता ताम्हणकर,प्रोजेक्ट डायरेक्टर ग्रिष्मा जाधव उपस्थित होते. या प्रसंगी ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनने महाराष्ट्रातील टॅलेन्ट ८३ जणांना सन्मानीत केले. या आधी पण डॉ.संगिता बियाणी यांना त्यांचे कार्य पाहता देशभरातून विवीध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन तर्फे ज्ञान भूषण,समाज भूषण,विधी भूषण,साहित्य भूषण,क्रीडा भूषण,छात्र भूषण,उद्योग भूषण, सेवा भूषण,कृषी भूषण,कला भुषण,नारी भूषण असे विविध पुरस्कार यावेळी देण्यात आले.डॉ संगीता बियाणी यांना राज्यस्तरीय नारी भुषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,कांताबाई बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रोनक बियाणी,आयुषी बियाणी,मुस्कान बियाणी,पियुष बियाणी,राजू पारिक,प्रवीण भराडिया,गोपाल ठाकूर सह नातेवाईकांनी कौतुक केले. फोटो कॅप्शन – भुसावळच्या डॉ.संगिता बियाणी यांना पुणे येथे नारी भुषण पुरस्काराने सन्माणीत करतांना पद्मश्री सुधारक ओळवे.



