वरणगाव – ,
वरणगाव येथील सिव्हिल सोसायटी मार्फत दि 7 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे टिशर्टस आणि बिबचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भरत चौधरी होते.प्रसंगी मॅरेथॉन स्पर्धेसाठी ज्यांनी प्रायोजक म्हणून आर्थिक मदत केली त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रायोजक म्हणून गोदावरी फाउंडेशन, मानवतकर हॉस्पिटल, साई ज्वेलर्स,परफेक्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूल,शुभम कन्स्ट्रक्शन, सृष्टी कन्स्ट्रक्शन,वासुदेव नेत्रालय, एनेरझल,भोईटे हॉस्पिटल,सॉफ्ट टेक कॉम्प्युटर्स यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले.
तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व वरणगाव सिव्हिल सोसायटी सदस्य डॉ राहुल भोईटे,प्रा.डॉ.अनिल शिंदे सर,डॉ अनुजा भोईटे , जयंत जोशी सर,निलेश झोपे,गोपाल गावंडे, श्रीकांत माळी,शरद पाटील,राहुल सोनवणे, राजेश चौधरी, रामचंद्र पाटील,कमलेश येवले, दीपक सोनार, तुषार अहिरराव, लखन कुंभार, आर एन पाटील,सौ श्रद्धा चौधरी, शुभम अमृते, वैभव खराटे,गोटू न्हावी,शरद पाटील,यांनी परिश्रम घेतले .



