भुसावळ : पत्रकारांनी सत्यता पडताळून निर्भीड बातम्या कराव्यात तसेच बदलत्या काळानुसार स्वतःमध्येही बदल घडवून पत्रकारीता करावी पत्रकारांचा लढा पत्रकारांसाठी या तत्वांवर स्वतःला न्याय मिळवून द्यावयाचा असल्यास त्यासाठी सर्वानी एकसंघ असावे, असा सूर भुसावळ येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवर व पत्रकारांनी व्यक्त केला. शहरातील जामनेर रोडवरील संतधाममध्ये व्हाईस ऑफ मिडिया भुसावळ व श्रमिक पत्रकार संघ संस्थेच्या संयुक्तविद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त शनिवार, 6 डिसेंबर रोजी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दर्पणशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले . तसेच यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

पत्रकारांनी एकसंघ होणे गरजेचे
याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांमधून शिक्षक तथा महाराष्ट्र सारथीचे नाना पाटील, दिव्य मराठीचे श्रीकांत सराफ, देशदूतचे संजयसिंग चव्हाण, दैनिक तरुण भारतचे गणेश वाघ यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. पत्रकारीतेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागणे व काम करणे अपेक्षित आहे. पत्रकारांनी 24 तास सतर्क राहिले पाहिजे व एकोप्याने राहून आपली कौशल्य वाढवणे गरजेचे आहे. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्राचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेल्याने पत्रकारांनी सर्व क्षेत्राशी निगडित माहिती ठेवून कार्य करावे. पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत व या समस्या सुटण्यासाठी पत्रकारांनी एकसंघ होणे गरजेचे असल्याचा सूरही व्यक्त झाला.यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य वासेफ पटेल , व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्षा उज्वला बागुल , तालुका उपाध्यक्ष श्याम गोविंदा , श्रीकांत सराफ वौइस् ऑफ मीडिया संघटना उर्दू विभागाचे जळगांव जिल्हा महासचिव सद्दाम खाटीक , तालुका संघटक संजीव काशिव , महिला बार कौन्सिल अध्यक्ष अँड जास्वंदी भंडारी , हर्षल पाटील , कमलेश चौधरी, , विनोद गोरधे, सुरेंद्र पाटील,अपर्ण हॉस्पिटलच्या डॉ सुवर्णा गाढेकर , प्रसिद्ध उद्योजिका शिवम पोहाच्या संचालिका सुनीता जोशी , अनिता आंबेकर , प्रियांका चौधरी, सारिका सूर्यवंशी , नवल चव्हाण , अंजुम खान ,सुनंदा डांगे , ,गायत्री विसपुते, अनिता आंबेकर, प्रियंका चौधरी, यांचेसह मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयसिंग चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक उज्वला बागुल यांनी केले व आभार श्याम गोविंदा यांनी मानले .







