67’व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा 2023-24 च्या बॉक्सिंग स्पर्धेत केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिकले पदक.

भुसावळ – भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे 23 ते 29 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अकोला येथे 67′ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
अकोला येथे आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील एकूण 35 खेळाडूंनी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या वतीने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या चांगल्या तयारीसाठी केंद्रीय विद्यालय संघटनेतर्फे केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी, भुसावळ येथे 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरातील 35 खेळाडूंना राजश्री शाहूजी महाराज बॉक्सिंग अकादमी च्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.
संस्थेच्या खेळाडूंनी पदक जिंकल्याबद्दल केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक डीएस.नंदेश्वर यांच्या सह संपूर्ण शाळा परिवाराने आनंद व्यक्त केला.