फुलगाव शिवरात विद्युत ताराची चोरी

भुसावळ – तालुक्यातील फुलगाव शिवरात लघुदाबाच्या सत्तर हजार रुपये किंमतीच्या विद्युत ताराची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे

या बाबत असे तालुक्यातील फुलगाव शेती शिवारातील भास्कर दशरथ सोनवणे याच्या शेत गट न २२ ते नरेंद्र सदाशिव चौधरी यांच्या शेत गट ४३ पर्यतच्या बारा गाळ्या वरील अल्युम्यु नियमच्या सत्तर हजार रुपये किंमतीच्या लघुदाबा विद्युत तारा अज्ञात चोरानी दि २७ बुधवार च्या रोजी चोरून घेऊन गेल्याची घटना उघडकीस आली
या बाबत गंगाराम वरजू भादले (विज कर्मचारी ) यांच्या फिर्यादी नुसार वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे