भुसावळ – हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची शहानिशा करून मदतीसाती जाऊन आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलिस कर्मचार्यावर एका 22 वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगरा जवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी दुपारी दोन वाजता घडली होती. या घटनेतील संशयित आरोपी तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडालीआहे. सुनील व्यंकय्या मैलेलू (वय २८) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे.
कौटुंबिक वादानंतर मुलाकडून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्रस्त पित्याने 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली होती या हेल्पलाईन नुसार मदतीसाठी गेलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण यांच्यावर संशयित तरुणाने हल्ला केला होता . संशयित आरोपी तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे



