भुसावळ – दिपनगर ता.भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिपनगर सन २०२३ ते २०२८ या कालावधीची निवडणूक नुकतीच पार पडली असून निवडणूक अगदी चुरशीची झाली. सदर निवडणुकीत संयुक्त आदर्श पॅनलचे तेरा उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. सर्वसाधारण उमेदवार विनोद भिरूड, किरण बोरोले, विकास पाटील, श्रावण बोरोले, सुरेश वरणकर, अनिकेत सोळसकर, ज्ञानेश्वर धनगर, मनोहर बाऱ्हे, महिला राखीवमध्ये ज्योती कवठे, सुजाता बऱ्हाटे, तर इतर मागासवर्गीय मध्ये सचिन भिरुड, अनु.जाती-जमाती मध्ये रोशन वाघ, वि.जा.भ.ज.य.व.वि.मा.प्र दिपक तायडे हे संयुक्त आदर्श पॅनलचे तेरा उमेदवार विजयी झाले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे पॅनल प्रमुख मिलिंद खंडारे, अनिल लाड, मनोज मोरे, निश्चल झोपे, राजेंद्र सोनोने व सर्व सहकारी मित्र यांनी अभिनंदन केले. प्रत्येक सोसायटी सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे पॅनल प्रमुख मिलिंद खंडारे यांनी सांगितले.



