भुसावळ – येथे आज अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाची शोभायात्रा हर्षोल्लासात मंगल वातावरणात काढण्यात आली
. 22 जानेवारी 2024 रोज सोमवार या दिवशी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण तमाम भारतीयांना देण्यासाठी दि.1 जानेवारी ते 15 जानेवारी 24 दरम्यान विषेश अभियान राबविण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून घरोघरी जाऊन अक्षदा वाटप करण्यासाठी अयोध्येतून अक्षदा घेऊन मंगल कलश आज भुसावळात दाखल झाला.
मंगल कलश शहरात दाखल होताच प्रमुख मार्गावरून कलश यात्रा काढण्यात येऊन ठिकठिकाणच्या मंदिरात कलश (अक्षदा ) पोहचविण्यात आले व प्रसंगी नागरिकांनी राम नामाच्या जयघोषात मंगल कलशावर पुष्प सुमनांचा वर्षाव करीत स्वागत केले या प्रसंगी संपूर्ण भुसावळ शहर जय राम श्री राम नामघोषाने दुमदुमले





