जळगाव :- बालेवाडी,पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दि. २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सुरू असूनआज जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. हे ऐतिहासिक असे 50 वे प्रदर्शन असून त्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांच्यावर आहे. त्यासाठी पूर्ण देशभरातून प्रत्येक राज्यातून लहान व मोठ्या गटातून प्रथम तीन विद्यार्थ्यांच्या उपकरणांना प्रदर्शनाची संधी मिळाली असून,ही सर्वोत्कृष्ट उपकरणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पाहता यावीत म्हणून शासनाने सर्व जिल्ह्यातील ह्या वर्षी प्रत्येक तालुक्यातुन विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शासन खर्चमधून प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
जिल्ह्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रथम क्रमांक तालुका स्तरावर मिळवलेल्या शाळेतील मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांची बैठक घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना पुणे येथे प्रदर्शन पाहण्यासाठी आवाहन करण्यात आले होते यापैकी 14 विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे 12 शिक्षक यांना पाठवण्यात आले परिवहन महामंडळाच्या बसने हे विद्यार्थी गुरुवारी सकाळी 11 वाजता पुण्याकडे रवाना झाले या गाडीला माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर उपशिक्षणाधिकारी एजाज शेख विजय पवार विद्यानिकेतन चे प्राचार्य सुनिता गरुड विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे सचिव सुनील वानखेडे संजय पाटील आदींनी गाडीला झेंडे देऊन झेंडा दाखवून रवाना केले

विद्यार्थ्यासाठी एक सुवर्णसंधी
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन होत आहे या प्रदर्शनात तुम्हा विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांनी येथील विविध वैज्ञानिक उपकरणांची माहिती घेऊन त्यांचे सादरीकरण कशा पद्धतीने केले जाते याचा अभ्यास करा त्याच्या नोंदी वही वरती घ्या यामुळे येणाऱ्या जिल्हास्तरावरील प्रदर्शनात तुम्हाला फायदा होईल ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे
डॉक्टर किरण कुवर शिक्षणाधिकारी माध्यमिक


