शशिकांत हिंगोणेकर यांच्यायुद्धरत या काव्यसंग्रहाला मैत्र काव्यपुरस्कार” घोषित :

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणा-या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा जि. कोल्हापूर येथील सन्मानाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार घोषित झाले आहेत. ‘मृत्यूजंय’ कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार
“तिचं काय चुकलं “
लेखक- संजय महल्ले अमरावती

कै. दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार
मी आहे
लेखक-सुनिल जाधव,पालघर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार
“उंबळट”
लेखक-डॉ. गोपाळ गावडे,चंदगड

बाल साहित्य काव्य पुरस्कार
गम्माडी गंमत
कवयित्री-डॉ. वसुधा वैद्य नागपूर

मैत्र काव्य पुरस्कार
युद्धरत
कवी- शशिकांत हिंगोणेकर
जळगाव
यांना घोषित झालाय. पुरस्कार वितरण समारंभ २३डिसेबंर २०२३ला आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता
सौ.पारू मदन नाईक यांचे प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. अशोक बाचुळकर यांचे अध्यक्षतेखाली
वितरीत करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रू ५०००/-स्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रत्येकी दिले जाणार आहे. मराठी साहित्यात निरपेक्ष वृत्तीने दिला जाणार सन्मानाचा हा पुरस्कार मानला जातो.