मराठा वकील विकास मंचचा जिल्हास्तरीय भव्य स्नेह मेळावा :मराठा वकिलांसाठी कल्याणकारी योजना मंचाच्या मार्फत राबविल्या जाणार ….. ॲड.भरतराव देशमुख

भुसावळ – येथे मराठा वकील विकास मंचचा जिल्हास्तरीय मेळावा लोणारी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली महाराजांचा जयघोष यावेळी उपस्थितांनी केला दरम्यानच्या काळात निधन झालेल्या मराठा वकिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन माननीय ॲड .भरतराव देशमुख यांनी भूषविले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. ए जी. पाटील, ॲड. ए. पी.पवार, ॲड .आर आर पाटील, ॲड .सुधाकर पाटील उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत व सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेले ॲड . श्रीकृष्ण दुपटे, ॲड.निलेश लोखंडे , ॲड .ईश्वर पाटील ॲड. देवेंद्र बोरसे यांचा सत्कार करण्यात आला तसेच वयाच्या 72 व्या वर्षी जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे ॲड .आर आर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला
मराठा वकिलांनी संघटित व्हावे एकमेकांच्या साहाय्याने प्रगती करावी व आपल्या येणाऱ्या समस्यांसाठी, अडचणीमध्ये एकमेकांसोबत उभे राहावे हा अतिशय प्रामाणिक हेतू समोर ठेवून मंचाची स्थापना केली ही अतिशय कौतुकाची बाब आहे मी यासाठी सर्वांच्या पाठीशी उभा राहिल व ज्या काही कल्याणकारी योजना जिल्हा व तालुका स्तरावर वकिलांसाठी राबविता येतील त्यासाठी प्रयत्न करेल असे यावेळी अध्यक्षीय भाषणात ॲड .भरतरावजी देशमुख यांनी प्रतिपादन केले. मराठा विकास मंचची संकल्पना ज्यांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात आली असे ॲड .अनिल पाटील व ॲड .बापूराव आवरे यांचेही त्यांनी कौतुक केले
मराठा विकास मंच भुसावळ स्नेह मेळाव्याचे प्रमुख ॲड.सुशील बर्गे यांनी आपल्या मनोगतात मराठा वकिलांनी एकमेकांना मदत करावी आपला बांधव पुढे जात असेल, प्रगती करत असेल तर त्याला प्रोत्साहन देवून मोठे करावे असे सांगितले व भुसावळमध्ये कार्यक्रम घेण्याचा हेतू विशद केला प्रमुख पाहुणे ॲड .ए.जे पाटील यांनी सर्वांनी संघटन कौशल दाखवावे ज्यामुळे संघटन मजबूत होईल व त्यामुळे आपण इतर समाज बांधवांना मदत करू शकतो असे प्रतिपादन केले ज्येष्ठ विधिज्ञ ॲड .ए.पी. पवार नाना म्हणाले वकिलांची न्यायालयात काम करताना वागणूक नम्र असावी तसेच विकास मंच फक्त परिचय व स्नेहमेळावा या पुरताच मर्यादित न राहता इतरही कार्य मंचाकडून व्हावे असे मत मांडले ॲड .आर. आर .पाटील यांनी आपले विचार आचार चांगले असतील व त्याला व्यायामाची जोड असेल तर शरीर निरोगी राहिल असा सल्ला देत वकिलांनी एकमेकांना मदत केली पाहिजे असे मत व्यक्त केले मराठा समाज बहुजन असला तरी आपला कणा माणुसकीचा आहे म्हणून वकिली करताना माणुसकी जपली पाहिजे असे यावेळी जेष्ठविधीज्ञ ॲड .सुधाकर पाटील यांनी सांगितले मेळाव्यात प्रत्येक तालुका प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
मराठा वकील विकास मंचाची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली आहे हे प्रस्तावनेत ॲड .तुषार पाटील यांनी सांगितले . ॲड .जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी बहारदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . उपस्थितांचे आभार ॲड . प्रफुल्ल पाटील यांनी मानले. या स्नेह मेळाव्यासाठी ॲड. पी. आर. मोझे ,ॲड .दर्शन देशमुख, ॲड .किशोर पाटील ॲड .संजय चौधरी, ॲड. जयश्री देशमुख ॲड. स्वाती निकम ॲड .निलेश भंडारी ॲड .संदीप पाटील ॲड . स्मिता पाटील ॲड .मनीषा आवारे , ॲड .कल्याण पाटील ॲड .गोपाळ जळमकर , ॲड. व्हि.पी महाजन तसेच छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील विधिज्ञ व जिल्ह्यातील भुसावळ सह रावेर, यावल ,बोदवड, मुक्ताईनगर , भडगाव , पाचोरा ,पारोळा, जळगाव, जामनेर ,धरणगाव येथील मराठा वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड.सुशील बर्गे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.