दीपनगर येथे महाराष्ट्र कंत्राटदार कृती समितीकडून मुख्य अभियंता आव्हाड यांचा सत्कार

दीपनगर :- नुकताच भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्र, दीपनगर वीज केंद्राला देशातून “राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार” दिल्ली येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी स्वीकारला.
त्या निमित्त महाराष्ट्र कंत्राटदार कृती समितीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.
यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी केला तर उप-मुख्य अभियंता अशोक भगत यांचा सत्कार समितीचे सचिव प्रकाश सरदार व उप-मुख्य अभियंता आर. एम.सोनकुसरे यांचा सत्कार समितीचे कार्यअध्यक्ष रामचंद्र तायडे उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी केला,
या कार्यक्रमचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी केले याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष फिरोज पठान,उमेश पाटील, उस्मान पठान,समितीचे सदस्य महेश पिठले, जगदीश तराड,सुरेंद्रसिंग ठाकूर,प्रशांत निकम, अरुण पाटील, विजय तायडे, भावेश चौधरी, दीपक वाढे, निशांत निकम, बंटी सरदार, गणेश नागणे,राहुल इंगळे, सनी चाहेल, नारायण झटके, संतोष तांबे, श्रावण गायकवाड, चंदन चौधरी,संतोष सोनवणे,संदेश पाटील,
भारत सरोदे, प्रमोद पाटील, संतोष तेलंग, विनोद आवारे, स्वप्नील चौधरी, गौरव सरदार,संतोष तांबे,प्रवीण पाटील