भुसावळ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, 30 रोजी भुसावळ व मलकापूर विभागाच्या दौर्यावर येत असल्याची माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी पत्रकार परीषदेत दिली. जिल्हाध्यक्ष बावनकुळे यावेळी तीन विधानसभा मतदारसंघाची शहरात बैठक घेतील तसेच भाजपा सुपर वॉरीयर्सला ते मार्गदर्शन करणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी रॅलीदेखील काढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

भुसावळसह मलकापूरात बैठक : अमोल जावळे
आमदार सावकारे यांच्या सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौर्या संदर्भात सुक्ष्म नियोजन बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 2024 च्या नियोजनासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दौर्यावर येत आहेत. याप्रसंगी भुसावळ, चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघाबाबत बैठक होईल तसेच जामनेर, मुक्ताईनगर-बोदवड व नांदुरा मतदासंघाबाबत मलकापूरात बैठक होणार आहे. सुपर वॉरीयर्सची जवाबदारी व दायीत्व याबाबतही प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शन करतील.


