भुसावळातील जवाहर नवोदय विद्यालयात दोन दिवशीय रिजनल कल्चलर मीट एन्ड आर्ट एक्झीब्युशन २०२३चे आयोजन :

भभुसावळ – भुसावळातील जवाहर नवोदय विद्यालयात दोन दिवशीय प्रादेशिक सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनी अंतर्गत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रिजनल कल्चलर मीट एन्ड आर्ट एक्झीब्युशन २०२३ या दोन दिवशीय रिजनल लेव्हलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दिनांक २ व ३ डिसेंबर रोजी असून या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र,गोवा, गुजरात,द्वीपदमण येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या दोन दिवसात विविध कल्चलर प्रोग्राम व राईटिंग रेगूशन,सेमिनार, नृत्य, गायन, नाटक अशा विविध प्रकारच्या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव पाटील मंत्री जल आपूर्ति व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन, आयुष प्रसाद जिल्हाधिकारी,जिल्हा जळगाव, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एस राजकुमार,बी वेंकटेश्वरन आयुक्त,नवोदय विद्यालय समिती पुणे संभाग मेरी मनी सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती पुणे, संभाग. तसेच कार्यक्रमाच्या समापन समारोहसाठी मुख्य अतिथी उन्मेश पाटील सांसद जिल्हा जळगाव, संजय सावकारे आमदार,भुसावळ. बी. वेंकटेश्वरन आयुक्त नवोदय विद्यालय समिती पुणे,संभाग मेरी मनी सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती पुणे, संभाग. कृष्णात पिंगळे उप पोलीस अधीक्षक, पोलीस कार्यालय भुसावळ या मान्यवरांची उपस्थिती सदर कार्यक्रमास लाभणार आहे व समारोप समारंभात विजेत्यांना दिनांक ३ रोजी बक्षीसे व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य विजय अंभोरे यांनी दिली.