.

भुसावळ –
भुसावळ – येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्या..त दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नविन कपडे, नवीन चपला, बूट आणि शालेय साहित्य, किराणा गोळा करायचे. गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायची असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.
समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने सन २०१६ मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसऱ्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसऱ्या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी, पाचव्या वर्षी जामुन झिरा, सहाव्या वर्षी डोंगरदे, सातव्या वर्षी गायरान या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील नागादेवी आदिवासी पाड्यावर ११ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शहरवासीयान कडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे .ज्यांना शक्य नसेल पण देण्याच सुख अनुभवायच असेल त्यांनी नविन कपडे, जुने कपडे स्वच्छ धुवुन व इस्त्री करुन द्यावे.फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक प्रदिप सोनवणे,सह समन्वयक समाधान जाधव, सह समन्वयक योगेश इंगळे यांनी केले आहे.
उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, डॉ.संजू भटकर, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे,डॉ. श्यामकुमार दुसाने, भूषण झोपे, राहुल भारंबे, ललित महाजन, निवृत्ती पाटील, हितेंद्र नेमाडे, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, मंगेश भावे, संदीप सपकाळे,महेश फिरके अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.
नवे जुने कपडे गोळा करणार
गेल्या वर्षी या उपक्रमात फराळासह नवे आणि जुने कपडे गोळा करण्यात आले होते,ते जवळपास ४५० व्यक्तीना वाटप करण्यात आले होते.सोबतच फराळ, नविन चपला, शालेय साहित्य, साखर, तांदूळ सुद्धा वाटला होता. यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लॅकेट असतील ते आणि इतर मदत प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे ९ नोव्हेंबर पर्यंत द्यावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख जीवन महाजन यांनी केले आहे.


