वरणगाव – शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी जनक्रोश मोर्चात सरकारचा निषेध व्यक्त करीत बस स्थानक चौकात एक तास ठिय्या आंदोलन केले

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जंरागे (पाटील ) त्यांच्या समर्थानात संपुर्ण राज्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करीत असताना वरणगाव शहारात सकल मराठा समाजाच्या वतीने जनक्रोश मोर्चा काढण्यात आला होता सुरुवातीला समस्थ बांधव एकत्री येत भोगावती नदी पात्रा जवळील भवानी माता मंदिरा जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार घालून जनक्रोश मोचाला सुरुवात करुण बस स्थानक चौका पर्यत जनक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत एकतास ठिय्या आंदोलन केले
यावेळी समाज बांधकानी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त करीत मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गात समावेश व्हावा , तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे किंवा ओ बी सी प्रवर्गाला धका न लावता मराठा समाजाला स्वतंत्र वर्ग निर्माण करून आरक्षण द्यावे , विभागाय भेद न पाळता महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीचे निवेदन सह पोलीस निरिक्षक आशिक आडसुड यांना देण्यात आले
जनक्रोश मोर्चात लहान बालका सह महिला व पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते


