भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्राप्त :



भुसावळ – यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहात दिनांक 30 रोजी
आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान केले. विजेत्या भुसावळ विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या हस्ते हे शिल्ड स्वीकारण्यात आले.
यामध्ये विभागातील सर्व विभागांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्राप्त झाले आहे.
अभियांत्रिकी विभागामार्फत एकूण २७८ किलोमीटर ट्रॅकवर रेल्वे नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विभागातील 24 लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्यात आले. भादली, जळगाव, शिरसोली, म्हसावद, माहेजी आणि पाचोरा स्थानकाच्या ७२ कि.मी. लूप लाइनचा वेग ताशी 15 किमीवरून 30 किमी प्रतितास करण्यात आला आहे. चाळीसगाव ते धुळे या 56 किमी लांबीचा वेग 100 किमी प्रतितास वरून 110 किमी प्रतितास करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी 4 पादचारी पुलाचे (एफओबी) कार्य पूर्ण झाल्याने हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. विभागातील पुलांखालील 32 नवीन आरयूबी रस्त्याचे काम पूर्ण होऊन सुरू झाले असून त्यामुळे स्थानिकांची सोय झाली आहे. एकूण मंजूर 379 पुलांपैकी 163 पुलांच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. विभागातील वाहतूक गतिशीलता सुधारण्यासाठी, लूप लाईन विस्तार, लाईन क्षमता सुधारणा इत्यादी एकूण 28 कामे चिन्हनीत करण्यात आली आहेत. त्यापैकी 07 कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत. उर्वरित 21 कामांपैकी 07 कामे या वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. इगतपुरी-बडनेरा विभागाचा वेग ताशी 110 किमीवरून 130 किमी प्रतितास करण्यात आला आहे. या कार्यासाठी अभियांत्रिकी विभागाला महाव्यवस्थापकांकडून शिल्ड मिळाली आहे.
परिचालन विभागाकडून जळगाव ते भुसावळ ही २५ किमीची नवीन चौथी लाईन सुरु करण्यात आली आहे हि लाइन पश्चिम रेल्वेला जोडण्यात आली आहे, ज्यामुळे पश्चिम रेल्वेकडे येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुलभ झाली आहे. अमरावती स्थानकात २६ डब्यांची तपासण्यासाठी पिट लाइनच्या विस्तारीकरणासह यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण झाले आहे. शिरसोली स्थानकाची डाउन लूप लाईन 753 मीटरने वाढवण्यात आली आहे. नांदुरा, अस्वली, बोरगाव स्थानकांवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात आले.मूर्तिजापूर येथे पूर्ण लांबीची मालवाहू गाडी बसवण्यासाठी यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात आले.
सिग्नल व दूरसंचार विभागामार्फत पावसाळ्यात पुरापासून बचाव करण्यासाठी विभागात एकूण ३६ नवीन ठिकाणी ट्रॅकवर नवीन वॉटरप्रूफ पॉइंट मोटर्स बसविण्यात आल्या आहेत. विभागातील 8 पीआरएस आरक्षण केंद्र येथे 64 Kbps BSNL लीज सर्किट्स 2 Mbps वर श्रेणीसुधारित करून त्यांचा तिकीट चा वेग सुधारला. विभागात एकूण 15 ठिकाणी नवीन फायर अलार्म सिस्टीम देण्यात आली. विभागातील लूप लाईन वाढविण्यात आली – दुसखेडा, नांदुरा, अस्वली, बोरगाव स्थानकांवर आणि मूर्तिजापूर स्थानकावर लांब मालगाड्यांसाठी लांब लूप लाईन वाढविण्यात आली. वरणगाव – बोदवड विभागात स्वयंचलित ब्लॉक सिग्नल यंत्रणा सुरू. शेगाव, जळगाव, खांडवा या स्थानकांवर कोच डिस्प्ले बोर्डची सुविधा देण्यात आली होती.
यांत्रिक विभागाकडून ROH डेपोमध्ये 4928 वॅगनचे ROH करण्यात आले.भुसावळ यार्डात 7409 सिक वॅगन फिट करण्यात आल्या. ऑगस्ट 2023 मध्ये ROH डेपो मध्ये 501 वॅगनचा सर्वोच्च ROH होता. ऑक्टोबर 2023 मध्ये भुसावळ यार्ड येथे एकूण 320 मालगाड्यांची चाचणी घेण्यात आली. या कामासाठी यांत्रिकी विभागाला महाव्यवस्थापकांकडून शिल्ड मिळाली आहे.
विभागीय रेल्वे रुग्णालयाकडून वैद्यकीय प्रकरणांच्या निपटाराकरिता प्राप्त झालेल्या दाव्यांची संख्या 628 होती आणि एकूण 542 दावे निकाली काढण्यात आले. रुग्णांसाठी नूतनीकरण केलेले ओपीडी केंद्र सुरू करण्यात आले, जे रुग्णांना सुविधा देत आहे. ओपीडी सेंटरमधील डॉक्टरांची माहिती, ओपीडी रूम नंबर हेल्प सेंटरमधील डिस्प्लेद्वारे दाखवले जातात. बुरहानपूर स्थानकावर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून 108 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. भुसावळ, नाशिक, खांडवा स्टेशनवर कार्डिओ संबंधित कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यसाठी भुसावळ रेल्वे रुग्णालयाला महाव्यवस्थापकांकडून शिल्ड मिळाले आहे.

कार्मिक विभागाद्वारे विभागातील अनुकंपा ग्राउंड (CG) उमेदवारांची जलद भरती करण्यासाठी संगणकीकृत ऑनलाइन मॉड्यूल विकसित केले गेले आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांत अशा 82 अनुकंपा ग्राउंड (CG) नियुक्त्या करण्यात आल्या. यावर्षी विभागातील विविध विभागात एकूण 932 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन विभागाने नव्याने बांधलेला भुसावळ-जळगाव विभाग एकूण 31.30 कि.मी. या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने चौथ्या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनच्या गाड्या चालवल्या जात आहेत.
सामान्य विद्युत विभागाने प्रथमच बडनेरा, भुसावळ, नांदगाव आणि दुसखेडा रेल्वे स्थानकावर स्वयंचलित प्रकाश यंत्रणा बसवली आहे. विभागात 8 नवीन लिफ्ट कार्यान्वित करण्यात आल्या: 2 मनमाड, 2 अमरावती, 1 नाशिक, 1 भुसावळ, 1 जळगाव, 1 अकोला येथे . भुसावळ विभागात 2, अकोल्यात 1 आणि नाशिकमध्ये 1 नवीन एस्केलेटर बसवण्यात आले आहेत.
वाणिज्य विभागाला एकूण 1570.41 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. भुसावळ विभागात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष – अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक या चार स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षातून प्रवाशांना प्रवासादरम्यान वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. तिकीट तपासणीतून एकूण 71 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. जळगाव माल गोदामाचे विकास काम पूर्ण, कसबे सुकणे येथे कांदा भरण्यासाठी माल गोदामाचे विकास काम पूर्ण. यात्री तिकीट सुविधा केंद्र नाशिकमध्ये 3, अकोल्यात 1, भुसावळमध्ये 2 आणि खांडव्यात 1 सुरू करण्यात आले आहे. जुलै 2023 मध्ये नाशिक स्टेशनवर एकूण 32 NMG रेक लोड करण्यात आले.
आरपीएफ विभागाने आरक्षण केंद्रावर आरक्षित तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या 49 प्रकरणांमध्ये 57 दलालांना अटक. ऑपरेशन “लिटिल एंजल्स” मध्ये – एकूण 273 हरवलेल्या मुलांचा (153 मुले आणि 120 मुली) शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
स्टोअर्स विभागाचे भंगार विल्हेवाट लावण्याचे एकूण उत्पन्न 86.3 कोटी रुपये होते जे 80 कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा 7.87% अधिक आहे.