भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी New Frontiers in Biological Sciences NFBS -2023 या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या विविध भागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, हे सदरील राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. सदर राष्ट्रीय परिषद सजीव सृष्टीतील विविधता, संशोधनाचे नवीनतम आयाम, संवर्धन, इ. नानाविध विषयांवर विचारमंथन करण्यास प्रेरक आणि पूरक ठरेल. या संशोधन परिषदेत प्रा.डॉ.एस.एम.गायकवाड, प्राणीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे बीजभाषण देणार आहेत. राष्ट्रीय परिषदेसाठी स्पॉट रजिस्ट्रेशन देखील केले जाणार असून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक,चेअरमन महेश फालक,सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा तसेच प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील संयोजन समिती प्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील आणि प्रा. डॉ.मनोजकुमार जाधव यांनी केले आहे.