भुसावळ – भुसावळ शहरातील म्युन्सीपल पार्क मधील रहिवासी यांचे धम्म नगर भागात इंटरनेट ऑनलाईन सर्व्हिस या नावाने महा ई सेवा केंद्र ( सेतू सुविधा केंद्र) सेतू चालक उत्तम काशिनाथ इंगळे यांनी (ता.३०) नोव्हेंबर २०२१ पूजा कोळी यांना नॉन क्रिमिलीअर दाखला मिळण्याकामी ऑनलाईन अर्ज केला असता सेतू सुविधा केंद्र चालकाने बनावट दस्तावेज तयार करून शासनांची व फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पूजा संजय कोळी (वय.२७) राहणार वेल्हाळे ता.भुसावळ यांनी (ता.१९/११/२०२१ ते ३०/११/२०२१) तसेच (१२/९/२०२३ ते २०/९/२०२३) दरम्यान संशयित आरोपी उत्तम काशिनाथ इंगळे हे इंटरनेट ऑनलाईन सर्व्हिस या नावाने महा ई सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र) मधून कागदपत्रांची पुर्तता केली होती. त्यावरून सदर सेतु चालक याने (ता.३०/११/२०२१) रोजी पुजा संजय कोळी हिस नॉनक्रिमेलिअर दाखला दिलेला आहे.त्यानंतर पुजा संजय कोळी हे मुबंई पोलीस दलात निवड झाल्याने तिचे सदर नॉनक्रिमेलिअर प्रमाणपत्र पडताळणी कामी तहसीलदार भुसावळ यांचेकडे प्राप्त झाले होते.सदरचे नॉन क्रिमेलिअर हे उत्तम काशिराम इंगळे यांनी बनावट तयार करुन ते पुजा संजय कोळी यांना दिल्याचे दिसुन येत आहे.तसेच उत्तम काशिराम इंगळे याने पुजा संजय कोळी यांना, कागदपत्रे नॉनक्रिमेलिअर दाखल्याचे पडताळणी करीता तहसीलदार यांनी मागवीलेले आहेत असे सांगुन तिचेकडुन कागदपत्रे प्राप्त करुन घेवुन (ता. २०/०९/२०२३) रोजी पुजा कोळी हिची संमती न घेता अगर तिस काहीएक माहीती न देता तिच्या नावे नॉनक्रिमेलिअर मिळणे करीता बनावट अर्ज सादर करुन सदर अर्ज प्रकरणांमध्ये तलाठी वेल्हाळे- जाडगाव- मन्यारखेडे यांचा (ता.१२/०९/२०२३ रोजीचा संजय पुंडलीक कोळी (पुजा संजय कोळी हिचे वडील) यांचे नावाचा बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करुन तो प्रकरणा सोबत जोडुन सादर केलेला असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे उत्तम काशिराम इंगळे इंटरनेट ऑनलाईन सर्व्हिस या नावाचे महा ई सेवा केंद्र (सेतु सुविधा केंद्र) चालक रा. म्युन्सीपल पार्क नगर, भुसावळ यांनी इंटरनेट ऑनलाईन सर्व्हिस या नावाचे महा ई सेवा केंद्र (सेतु सुविधा केंद्र) माध्यमातुन बनावट नॉनक्रिमेलिअर तसेच तलाठी वेल्हाळे- जाडगाव- मन्यारखेडे यांचा बनावट उत्पन्नाचा दाखला तयार करुन शासनाची तसेच पुजा संजय कोळी रा. वेल्हाळे ता. भुसावळ यांची फसवणुक केली आहे म्हणून नायब तहसीलदार प्रिती लूटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


