शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील देवी मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी पूर्णत्वास :आकर्षक विद्युत रोषणाईसह रंगरंगोटी


भुसावळ (प्रतिनिधि ) –
आई राजा उदे उदे, येत्या १५ आक्टोंबर पासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्रोत्सवानिमित् शहरातील देवी मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून आकर्षक विद्युत रोषणाईसह रंगरंगोटी करण्यात आली आहे .देवी मंदिराचे पुजारी व भाविक भक्त मोठ्या आनंदाने व उत्साहात देवीच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहे .
याउत्साहानिमित्त बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर रेलचेल सुरू असून पूजा सामग्रीसह नारळ , खण, नारळ ,झेंडे ,हार फुले, यासह विविध खाद्य वस्तूची दुकाने थाटली आहे .
श्रीराम रेणुका माता मंदिर
भुसावळातील वांजोळा रोड जवळील श्रीराम रेणुका माता मंदिरामध्ये अश्विन शारदीय नवरात्र उत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे
नवरात्री उत्सवासाठी मंदिरामध्ये रंगरंगोटी केली असून विविध प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या मंदिराची स्थापना सन २००५ सालामध्ये करण्यात आली. श्री विलास जोशी या मंदिराचे संस्थापक आहेत.
या मंदिरामध्ये खाली भूयारामध्ये श्री रेणुका मातेची मूर्ती असून भुयारावर श्रीराम पंचायतन स्थापन करण्यात आले आहे. या मंदिराला जळगाव जिल्ह्यामध्ये काच शिशमंदिर (काचमंदिर) असे देखील संबोधण्यात येते.
नवरात्री उत्सवामध्ये मंदिरामध्ये रोज सकाळी देवीला महा अभिषेक करण्यात येतो. या नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमी दि. १९/१०/२०२३ रोजी मंदिरामध्ये कुमारीका पूजन करण्यात येईल.
अश्विन शुद्ध सप्तमी दि. २१/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ४ ते ६ यावेळेमध्ये देवीची संगीतमय झुल्या वरील साग्रसंगीत राजोपचार पुजा साजरी करण्यात येईल . या पूजेमध्ये देविला ५६ भोग नैवद्य दाखवितात.
तसेच अश्विन शुद्ध अष्टमी दि.२२/१०/२०२३ रोजी मंदिरात सकाळी हवनाचा कार्यक्रम तसेच संध्याकाळी ठीक ४ ते ६ या वेळेस देवीचा पालखी उत्सव साजरा करण्यात येईल.
नवरात्र उत्सवामध्ये रोज सकाळी आठ वाजता तसेच संध्याकाळी सहा वाजता देवीची महाआरती करण्यात येईल.
सर्वांनी या नवरात्री उत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमांचा तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मंदिराचे पुजारी श्री प्रशांत जोशी यांनी केली आहे.