भुसावळ – जायंट्स वसुंधरा सहेली प्रेरणा ग्रुपचा उपक्रम
250 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले
रविवार असल्यामुळे बाजाराचा दिवस असतो आणि त्या दिवशी बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि भाजीपाला घेताना किंवा फळे घेताना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो म्हणून आम्ही आमच्या ग्रुप तर्फे 250 कापडी पिशव्यांचे वाटप केले
ज्यांनी प्लास्टिक पिशवीमध्ये भाजीपाला ,फळे ,किंवा टोस्ट वगैरे असा सामान घेतलेला होता तर त्यांना आम्ही कापडी पिशवी देऊन त्यांच्या जवळील कॅरीबॅग जमा केल्या.
आजची परिस्थिती पाहता प्लास्टिक मुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे तरीही प्लास्टिक कॅरीबॅग चा वापर सर्रासपणे केला जातो, जर प्रत्येक व्यक्तीने ठरवले की मी घरूनही बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाईल व समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा मी प्लास्टिक स्वीकारणार नाही तर अशा गोष्टींना आळा बसू शकतो.
पिशवी वाटप करताना वसुंधरा व प्रेरणा ग्रुपच्या संस्थापिका महानंदा पाटील तसेच राजश्री बादशहा ,मंदाकिनी केदारे, मीना राजपूत ,अंजली वाघमारे, सुरेखा तायडे, वर्षा लोखंडे ,मोनाली लोणारी ,आशा पाटील, उपस्थित होत्या



