पैसे देण्याच्या कारणावरून भावानेच केला भावाचा खून : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना :

मुक्ताईनगर – तालुक्यातील पुरणार वस्तीवर खून घरात पैसे देण्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद होऊन भावानेच केला भावाचा खून केल्याच्या खळबळ जनक प्रकार समोर आला आहे

याप्रकरणी मारेकरी भावाला पोलिसांनी अटक केली आहे याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुखा मानकु शिंदे वय 45 राहणार पूर्णाड वस्ती तालुका मुक्ताईनगर असे मयताचे नाव आहे याबाबत अधिक माहिती की मुखा मानक शिंदे हे आपल्या परिवारासह मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड वस्ती येथे वास्तव्यास होते 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ पंढरी माणकु शिंदे यांच्यात पैशावरून वाद झाला या वादाचे रूपांतर राहणारीत झाले या रागातून पंढरी याने भाऊ मुखा शिंदे यांच्या डोक्यात दगड टाकला व त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मयत मुखा शिंदे यांचा मुलगा दगडू मुखा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरी माणकु शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पंढरी माणकु शिंदे याला अटक करण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेंडे करीत आहे