भुसावळ – रेल्वे रूग्णालयाच्या नुतनीकरन करण्यात आलेल्या ओपीडी युनिटचे नुकतेच उद्घाटन श्रीमती इति पांडे डीआरएम भुसावळ यांच्या हस्ते करण्यात आले.या रूग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या रूग्णालयात LED TV तसेच , सर्व डॉक्टरांचे फोटो , ओळखपत्र , पदवीसह माहिती मुख्य गेटवर बसविण्यात आले आहे, केसपेपर विभाग ही मुख्य प्रवेश द्वार जवळ उपलब्ध असेल. DRM पांडे यांनी यावेळी रूग्णालयातील रूग्णांना फळांचे वाटप केले, त्यानंतर रेल्वे रूग्णालयातील नव्याने बांधलेल्या बगीचा आनंद वाटिका व मध्य रेल्वेच्या महिला कल्याण समितीने रेल्वे रूग्णालयात दिलेल्या झेरोक्स मशीन चे उद्घाटन श्रीमती पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
रेल्वे शाळेच्या स्काऊट आणि गाईड्सनी त्यांच्या कार्यक्रमात पांडे यांचे हस्ते ध्वजारोहण केले, स्काउट्स/गाईड्सच्या अध्यक्षा म्हणून दिक्षा संस्कार केले, या कार्यक्रमादरम्यान स्काउट्स/गाईड्सच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यानंतर मुलांना बक्षिसे आणि भेटवस्तू, प्रमाणपत्र देण्यात आली..या प्रसंगी पांडे म्हणाल्या कीत्या स्वतः बालपणी स्काउट/गाईडच्या सदस्या होत्या आणि मुलांना शिस्त आणि बांधिलकी दिल्याने स्काउट/गाईडच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले ..



